दारुगोळा कारखान्या तर्फे दारुगोळा आणि शस्त्रास्त्र प्रदर्शन

 दारुगोळा कारखान्या तर्फे दारुगोळा आणि शस्त्रास्त्र प्रदर्शन

पुणे, दि. ८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आझादी का अमृत महोत्सव हा देशाची 75 वर्षांची प्रगती, इथली संस्कृती, लोक, त्यांचे कर्तृत्व आणि इथल्या गौरवपूर्ण इतिहासाचा सन्मान दर्शविण्यासाठी दारूगोळा कारखान्याकडून दारूगोळा आणि शस्त्रास्त्र प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.

स्वातंत्र्याच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त देशभर संरक्षण मंत्रालयातर्फे विविध शस्त्रास्त्र प्रदर्शने आयोजित केली जाणार आहेत.यामध्ये नागरिकांना देशाची संरक्षण सिध्दता पहाण्याची अपूर्व संधी मिळणार आहे.

पुणे हे शहर देशाच्या संरक्षणासाठी महत्वपूर्ण असे ठिकाण आहे जिथे संरक्षण खात्याच्या विविध संस्थांबरोबर, ३ मोठे दारुगोळा कारखाने (दारुगोळा कारखाना खडकी, अति विस्फोटक कारखाना खडकी आणि आयुध कारखाना देहू रोड) तसेच Munitions India Ltd. (MIL) चे मुख्यालय आहे.

गेली १५० हून अधिक वर्षे हे दारुगोळा कारखाने देशाची अविरत सेवा करत आहेत. यातील खडकी दारुगोळा कारखान्यातर्फे सदर दारुगोळा तसेच शस्त्रास्त्र प्रदर्शन आयोजित केले आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन रवी कांत, अध्यक्ष, MIL यांचे हस्ते, संजय हजारी, महाप्रबंधक यांचे उपस्थितीत काल दि ७ ऑगस्ट २०२३ रोजी बालगंधर्व नाट्यगृहात संपन्न झाले.

यात नागरिकांना कालपासून ४ दिवस सकाळी ०९.३० ते सायंकाळी ६.०० वाजेपर्यंत प्रदर्शन पहावयास मिळणार आहे. सदर प्रदर्शन विनामुल्य आहे. या प्रदर्शनाला तुफान प्रतिसाद मिळल्याचे दिसून आले. खडकी कारखान्याचे कुशल आणि अनुभवी कर्मचारी प्रदर्शनातील उत्पादनांची माहीती देण्यासाठी नियुक्त केले आहेत.

पुण्यातील तसेच आसपासच्या सर्व नागरिकांनी, उद्योजकांनी, विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा असे विजय मोहन यांनी आवाहन केले.
या प्रदर्शनामध्ये विविध प्रकारचे बुलेट गन मशिनरी AK47 रायफल, आर्टिलरी बॉम्ब ,बोफोर्स तोफासाठी वापरण्यात येणारे दारू गोळा अशा विविध प्रकारचे दारुगोळा या प्रदर्शनात ठेवण्यात आला आहे.

ML/KA/SL

8 Aug 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *