मुंबईतील पूर परिस्थिती रोखण्यासाठी आयआयटी, व्हीजेटीआय तज्ञांचा अभ्यास गट स्थापन करणार – आमदार अमीत साटम

मुंबई, दि ६: मुंबई भाजप अध्यक्ष आणि आमदार अमीत साटम यांनी महायुती बीएमसीमध्ये सत्तेत आल्यानंतर महापालिका प्रशासनात तरुण (Gen Z) विद्यार्थ्यांना सहभागी करून घेण्यासाठी एक नवीन इंटर्नशिप प्रोग्राम जाहीर केला. या इंटर्नशिप कार्यक्रमाद्वारे तरुण विद्यार्थी शहरी नियोजन आणि महापालिका प्रशासनत सुधारणा करण्यासाठी योगदान देतील, असे आमदार अमीत साटम यांनी सांगितले.
जगातील सर्वात मोठ्या युवा-संचालित नॉन प्रॉफिट संस्थांपैकी एक असलेल्या इंडियाज इंटरनॅशनल मुव्हमेंट टू युनायटेड नेशन्स (IIMUN) या युवा संघटनेने आयोजित केलेल्या वायबी चव्हाण सेंटर येथे आयोजित कार्यक्रमात आमदार अमीत साटम यांनी आज प्रथम मतदारांशी (Gen Z) संवाद साधला. या कार्यक्रमाची संकल्पना आणि नेतृत्व आयआयएमयूएनचे संस्थापक आणि अध्यक्ष ऋषभ शाह यांनी केले.
यावेळी बोलताना आमदार अमीत साटम यांनी सांगितल की, बीएमसी निवडणुकीनंतर आम्ही सार्वजनिक धोरण आणि प्रशासनात रस असलेल्या Gen Z विद्यार्थ्यांसाठी एक इंटर्नशिप कार्यक्रम सुरू करणार आहोत. या उपक्रमांतर्गत मुंबईच्या २४ प्रशासकीय वॉर्डमध्ये प्रत्येकी दोन इंटर्न नियुक्त केले जातील आणि बीएमसी मुख्यालयात दोन इंटर्न नियुक्त केले जातील. या कार्यक्रमात सार्वजनिक धोरण आणि प्रशासनाचे अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या ५० तरुणांना महापालिका व्यवस्थेचे निरीक्षण करण्यासाठी, सुधारणा सुचवण्यासाठी आणि शहरी नियोजन आणि महापालिका प्रशासन मजबूत करण्यासाठी संशोधन पेपर तयार करण्याची संधी मिळेल. बीएमसी निवडणुकीनंतर हे इंटर्न या कार्यक्रमांतर्गत बीएमसीमध्ये सक्रियपणे काम करतील, असे आमदार अमीत साटम म्हणाले.
आमदार अमीत साटम पुढे म्हणाले की इंटर्नशिप कार्यक्रम स्पष्ट निकषांसह व्यावसायिक निवड प्रक्रियेचे अनुसरण करेल. यामुळे महापालिका प्रशासनात योगदान देण्यासाठी पात्र Gen Z उमेदवारांची निवड होईल याची खात्री करेल, असेही साटम म्हणाले.
आमदार अमित साटम यांनी पुढे आयआयटी आणि व्हीजेटीआयच्या तज्ज्ञांचा समावेश असलेला एक अभ्यास गट स्थापन करण्याची घोषणा केली. तो गट बीएमसीच्या माजी महानगरपालिका आयुक्त आणि पर्जन्य जलवाहिन्या विभागाचे माजी मुख्य अभियंत्यांचे यांचे मत घेतील. अभ्यास गट मुंबईच्या भूप्रदेशरचनेचे आणि सरासरी वार्षिक पावसाचे विश्लेषण करेल. आणि शहरात पूर रोखण्यासाठी प्रभावी योजना आखण्यासाठी मुंबई सारखा पाऊस असलेल्या इतर आंतरराष्ट्रीय शहरांशी त्याची तुलना करेल, असे आमदार अमीत साटम यांनी सांगितले.
आमदार अमीत साटम यांनी या कार्यक्रमादरम्यान रस्ते, पूर, मोकळ्या जागा, कचरा व्यवस्थापन, पर्यावरण, पदपथ आणि सुरक्षितता यासारख्या शहराच्या विविध समस्यांवरही भाष्य केले आणि मुंबईविषयाचे त्यांचे व्हिजन मांडले.KK/ML/MS