आमदार अमित साटम यांची मुंबई भाजपच्या अध्यक्षपदी नियुक्ती
मुंबई दि २५– अंधेरी पश्चिम येथून तिसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून आलेले अमित साटम यांची मुंबई भारतीय जनता पक्षाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. अमित साटम २०१४ मध्ये काँग्रेसचे दिग्गज आमदार अशोक जाधव यांचा पराभव करून पहिल्यांदाच आमदार झाले.
अमित साटम हे मुंबई विद्यापीठातून पदव्युत्तर पदवीधर आहेत. त्यांनी माजी उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांचे सहाय्यक म्हणून काम केले आहे. त्यांनी २००८ ते २०१० दरम्यान मुंबई भाजप युवा मोर्चाचे सरचिटणीस म्हणून काम केले आहे.
२०१०-१३ दरम्यान ते मुंबई भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष होते. मिठीबाई कॉलेजमधून पदवीधर झालेले अमित साटम २०१२ मध्ये पहिल्यांदाच वॉर्ड क्रमांक-६२ मधून नगरसेवक म्हणून निवडून आले होते. ML/ML/MS