अमिताभ बच्चन यांचा जावई अडचणीत, निखिल नंदावर ‘हे’ आहेत आरोप

बीग बी अमिताभ बच्चन यांचा जावई निखील नंदा मोठ्या अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. उत्तर प्रदेशातील बदायूं येथे निखिल नंदा यांच्यासह नऊ जणांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फार्मा ट्रॅक्टर कंपनीच्या डीलरच्या आत्महत्येनंतर हे गंभीर प्रकरण समोर आलं आहे. निखिल नंदा आणि संबंधित 9 जण कंपनीचा सेल वाढवण्यासाठी सतत एजन्सी संचालकांना मानसिक त्रास द्यायचे. एजन्सी बंद करण्याची धमकीही दिली जायची. सतत होणाऱ्या त्रासाला कंटाळून एजन्सी संचालक जितेंद्र यांनी आत्महत्या केली होती. जितेंद्र यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या भावाने 9 जणांविरोधत गुन्हा दाखल केला. आता याप्रकरणी पोलीस कसून चौकशी करत आहेत.