आमिर खानला मिळाली नवी पार्टनर, साठाव्या वाढदिवसाला दिली पुन्हा प्रेमात पडल्याची कबुली

आमिर खानचा आज १४ मार्च रोजी ६० वा वाढदिवस आहे. काल १३ मार्चला त्याने पत्रकारांबरोबर प्री बर्थडे सेलिब्रेशन केले. यावेळी त्याने मिडियासमोर त्याच्या नव्या पार्टनरची ओळख करून दिली. आमिरच्या या मैत्रीणीचं नाव आहे गौरी स्प्रेट. गौरी ही तमिळ व आयरिश आहे. त्यांची २५ वर्षांपासूनची मैत्री आहे. पण, गेल्या दीड वर्षांपासून ते डेट करत आहेत. गौरी मूळची बेंगळुरूची आहे. आमिर खानच्या प्रॉडक्शन हाऊसमध्ये ती सध्या काम करत आहे. गौरीला एक मुलगा असून तो सहा वर्षांचा आहे. आमिरने प्रेमाची कबुली देताना गौरीबरोबर आनंदी असल्याचं म्हटलं आहे. तो त्यांच्या नात्याबद्दल गंभीर असून आमिरने गौरीची ओळख सलमान खान, शाहरुख खान तसेच आपल्या कुटुंबाला करून दिली आहे, अशी माहितीही समोर आली आहे.