भारतातील या प्रतिबंधित बेटावर गेल्यामुळे अमेरिकी यूट्यूबरला अटक

नवी दिल्ली, दि. ८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अंदामान-निकोबार बेटा नजिकच्या सेंटेनिअल बेटांवर जाण्यास भारत सरकारकडून प्रतिबंध करण्यात आला आहे. या बेटावर बेकायदेशीरपणे प्रवेश केलेल्या एका अमेरिकन युट्युबरला स्थानिक पोलिसांनी अटक केली आहे. गेल्या आठवड्यात स्थानिक न्यायालयाने त्याला १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवले. त्याला १७ एप्रिल रोजी पुन्हा न्यायालयात हजर केले जाईल. त्याला पाच वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि दंड देखील होऊ शकतो.
बेटाच्या पाच किमीच्या परिसरात लोकांना प्रवेश करण्यास मनाई आहे. ही लोकसंख्या हजारो वर्षांपासून जगापासून दूर आहे. येथे राहणारे लोक धनुष्यबाणाने प्राण्यांची शिकार करतात. जर कोणी बाहेरचा माणूस येथे पोहोचला तर त्याच्यावरही बाणांनी हल्ला केला जातो.
अमेरिकेतील अॅरिझोना राज्यातील रहिवासी असलेल्या मिखाइलो विक्टोरोविच पोलियाकोव्हला ३१ मार्च रोजी पोर्ट ब्लेअर येथे अटक करण्यात आली होती. याच्या दोन दिवस आधी तो भारतातील अंदमान आणि निकोबार बेटांच्या प्रतिबंधित सेंटिनेल बेटावर पोहोचला होता आणि तिथे डाएट कोक आणि नारळ ठेवले होते.
बेटाच्या पाच किमीच्या परिसरात लोकांना प्रवेश करण्यास मनाई आहे. ही लोकसंख्या हजारो वर्षांपासून जगापासून दूर आहे. येथे राहणारे लोक धनुष्यबाणाने प्राण्यांची शिकार करतात. जर कोणी बाहेरचा माणूस येथे पोहोचला तर त्याच्यावरही बाणांनी हल्ला केला जातो.
SL/ML/SL
8 March 2025