अमेरिकेने समुद्रात उतरवले शक्तिशाली ड्रोनभेदी लेझर शस्त्र
![अमेरिकेने समुद्रात उतरवले शक्तिशाली ड्रोनभेदी लेझर शस्त्र](https://mmcnewsnetwork.com/wp-content/uploads/2025/02/America-has-launched-a-powerful-anti-drone-laser-weapon-into-the-sea.jpg)
वॉशिग्टन डीसी. दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अमेरिकेने महाशक्तिशाली लेझर शस्त्राचे छायाचित्रे प्रसिद्ध केले आहेत. युद्धनौकेतून ड्रोन नष्ट करणाची ताकद या शस्त्रात आहे. या लेसर शस्त्राचे नाव HELIOS लेझर सिस्टम आहे. हे यूएसएस प्रीबल आर्ले बर्क क्लास डिस्ट्रॉयरमधून डागले जाते. हे शस्त्र विशेषतः ड्रोनच्या धोक्यांना तोंड देण्यासाठी डिझाइन केले गेले आहे. अलीकडच्या काळात अमेरिकेच्या युद्धनौकांनी मोठ्या प्रमाणात ड्रोन हल्ले हाणून पाडले आहेत, परंतु याचवेळी त्यांना मोठी किंमत देखील मोजावी लागली आहे. पण आता या लेझर शस्त्राच्या मदतीने शत्रूचे ड्रोन हाणून पाडण्याचे शस्त्र अमेरिकेने विकसित केले आहे.
यूएस सेंटर फॉर काउंटरमेझर्स (सीसीएम)च्या माहितीनुसार, या छायाचित्रांमध्ये अमेरिकेच्या HELIOS लेझर शस्त्राने ड्रोन नष्ट केल्याचे दिसून येतेय. HELIOS म्हणजे ‘इंटिग्रेटेड ऑप्टिकल-डॅझलर आणि सर्व्हेलन्ससह हाय एनर्जी लेसर’. हे शस्त्र लॉकहीड मार्टिनने अमेरिकन नौदलाला मदत करण्यासाठी विकसित केले आहे. अमेरिकेच्या युद्धनौका आणि महत्त्वाच्या जमिनींच्या सुरक्षिततेसाठी हे शस्त्र तैनात करण्याचे योजिले आहे.
SL/ML/SL
5 Feb. 2025