अंमली पदार्थ आळ्यासाठी केंद्रीय कायद्यात सुधारणा

मुंबई, दि. 18 (एमएमसी न्यूज नेटवर्क): अंमली पदार्थ सेवन आणि विक्री यावर आळा घालण्यासाठी केंद्र – राज्य सरकार संयुक्त बैठकीत चर्चा झाली आहे. याबाबतच्या केंद्रीय कायद्यात चार पद्धतीच्या सुधारणा करण्याची मागणी राज्याने केली आहे. याशिवाय परदेशी व्यक्ती आरोपी असल्यास त्याच्यावर खटला सुरू असेपर्यंत त्यांना विशेष स्थानबद्ध केंद्र तयार करून त्यात ठेवलं जाईल अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबतच्या लक्षवेधी सूचनेवर विधानसभेत दिली. रोहित पवार , नितेश राणे यांनी यावर चर्चा उपस्थित केली होती.Amendment of Central Law for Narcotic Drugs
राज्यातील दहशतवाद या बाबीची जबाबदारी विरोधी पथकाकडे नोडल एजन्सी म्हणून सोपविण्यात येणार आहे , याशिवाय जिल्हा स्तरावर अमली पदार्थ विरोधी पथके तयार केली जातील असं ही फडणवीस म्हणाले. अशा पद्धतीच्या गुन्ह्यात सरकारी यंत्रणेतील कर्मचारी सापडले तर त्यांना बडतर्फ केलं जाईल असेही फडणवीस म्हणाले.
सर्व औषध विक्रेत्यांवर ही कडक निर्बंध घालण्यात आले आहेत, शाळा आणि कॉलेज जवळचे पान विक्रेते यांच्यावर विशेष कारवाई सुरू आहे. लोकसंख्येच्या प्रमाणात पोलीस भरती या आकृतीबंधाला मान्यता दिली आहे, पुरेशा प्रमाणात भरती केली जात आहे असेही फडणवीस यांनी यावेळी स्पष्ट केले.
ML/KA/PGB
18 July 2023