आमदार अपात्रता सुनावणी अखेर पूर्ण , आता लक्ष निर्णयाकडे

 आमदार अपात्रता सुनावणी अखेर पूर्ण , आता लक्ष निर्णयाकडे

नागपूर, दि. २० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आज अखेर आमदार अपात्रते संदर्भातील याचिकेवरती रोज सुरू असलेली सुनावणी अखेर संपली आहे. मुंबई असो किंवा नागपूर आज अंतिम सुनावणी संपली. या संदर्भातील जे पुरावे सादर केले आणि जो युक्तिवाद झाला तसेच जे इतर कागदपत्रे आहे, त्याची तपासणी करून योग्य निर्णय त्याप्रमाणे दिला जाईल असे आज विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले.

पक्षांतर बंदीचा जो कायदा आहे यात अनेक वेळा संशोधन करून सुधारणा झालेले आहेत. प्रत्येक वेळी सुधारणा झाल्यानंतर हा कायदा अधिक बळकट आणि अधिक सक्षम झाला आहे. सुनावणी दरम्यान
सर्वोच्च न्यायालय असो किंवा उच्च न्यायालय या कायद्यातील अनेक तरतुदींचे वाचन हे वेगवेगळ्या पद्धतीने केलं गेलं असं नार्वेकर म्हणाले.

या अपात्रतेच्या प्रकरणात सर्व कायदेशीर तरतुदींचा अभ्यास करून आणि सगळ्या मुद्द्यांचा विचार करून आपण योग्य निर्णय घेऊ.जेणेकरून हा निर्णय राज्यातील पक्षांतर बंदी कायद्यासाठी एक दाखला ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

ML/KA/SL

20 Dec. 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *