श्री महालक्ष्मी अंबाबाई मंदिरात शारदीय नवरात्र उत्सवात घटस्थापना…

कोल्हापूर दि २२: दुष्ट प्रवृत्तींचा संहार करून भक्तांवर कृपादृष्टी ठेवणाऱ्या आदिमाया आदिशक्ती करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अंबाबाई मंदिरात आज विधिवत घटस्थापनेनं शारदीय
नवरात्रौत्सवाला कोल्हापुरात प्रारंभ झाला. आज श्री महालक्ष्मी अंबाबाई ची कमलादेवी रुपात पूजा बांधण्यात आली.
देशातील ५१ आणि महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी एक पूर्णपीठ असलेला महालक्ष्मी अंबाबाई मंदिर परिसर नवरात्रौत्सवा
साठी मंगलमयी वातावरण आणि रोषणाईने सजला आहे.
नवरात्र उत्सवा दरम्यान
देशभरातून सुमारे 25 ते 30 लाख भाविक दर्शनासाठी येथील येतील अशी अपेक्षा पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे सचिव शिवराज नाईकवडी यांनी व्यक्त केली.

दुर्गाज्योत नेण्यासाठी विविध राज्यांतून आलेल्या भाविकांच्या ‘उदं गं अंबे’ अशा
जयघोषाने उत्सवाच्या पूर्वसंध्येला मंदिर आवार दुमदुमला. यंदा दहा दिवसांचा नवरात्रौत्सव साजरा होणार असून मांगल्याचे पर्व
अनुभवण्यासाठी भाविक सिद्ध झाले होते.
आज सकाळी सात वाजून ३० मिनिटांनी श्री महालक्ष्मी अंबाबाईच्या मुख्य गाभाऱ्यात श्रीपूजक मुनीश्वरांच्या हस्ते मंत्रोच्चार आणि पारंपरिक तालवाद्यांच्या गजरात घटस्थापनेचा विधी संपन्न झाला. दुर्गाज्योत नेण्यासाठी विविध राज्यांतून आलेल्या भाविकांच्या ‘उदं गं अंबे’ अशा
जयघोषाने उत्सवाच्या पूर्वसंध्येला मंदिर आवार दुमदुमला.
रोज पालखीसह पंचमी,
नगर प्रदक्षिणेचा सोहळा
नवरात्रौत्सवात अंबाबाईची रोज रात्री साडेनऊ वाजता पालखी मिरवणूक
काढली जाते. फुलांनी सजवलेली पालखी गरुड मंडपातून मंदिर
प्रदक्षिणेसाठी बाहेर पडेल. हजारो भाविकांच्या साक्षीने होणाऱ्या या पालखी सोहळ्यासाठी फुलांची सजावट करण्यात येणार आहे, अशी माहिती पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या वतीने सचिव शिवराज नायकवडी यांनी दिली.
गर्दीवर नियंत्रणासाठी यावर्षी प्रथमच कृत्रिम बुद्धिमत्ता एआय तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार असून मंदिर परिसरात 120 सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत तसेच 11 ठिकाणी एलईडी स्क्रीन लावण्यात आल्या आहेत. मंदिर परिसरात सुमारे 400 पोलीस बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले आहेत असेही पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे सचिव नायकवडी यांनी सांगितलं. शारदीय नवरात्र उत्सवात श्री महालक्ष्मी अंबाबाई दशमहाविद्या स्वरूपात दिसणार आहे.
आजपासून सुरू झालेल्या शारदीय नवरात्र उत्सवात अंबाबाईच्या पूजा दशमहाविद्या पैकी ७ स्वरूपात बांधण्यात येणार आहेत
देवी महात्म्यांमध्ये सांगितल्याप्रमाणे शक्ती उपासनेमध्ये काली, तारा महाविद्या षोडशी भुवनेश्वरी । भैरवी छिन्नमस्ता च विद्या धूमावती तथा ।। बगला सिद्धविद्याच मातंगी कमलात्मिका । एता दशमहाविद्याः सिध्द्धविद्याः प्रकीर्तिताः||
या दशमहाविद्या म्हणजेच देवीच्या दहा स्वरूपांची उपासना अतिशय महत्त्वाची मानली गेली आहे. महा सती गौरीच्या क्रोधातून उत्पन्न झालेल्या तिच्या दहा रूपांना दशमहाविद्या असे नाव आहे. यातील प्रत्येक देवीचे स्वरूप वेगळे असून त्याच्या उपासनेचे फलही वेगळे आहे. देवी महात्म्यात वर्णन केलेल्या या रूपांची महती आणि माहिती देवी भक्तांना समजावी यासाठी या पूजा बांधण्यात येणार आहेत.
उद्या श्री बगलामुखी तर
बुधवारी (दि. २४ ) श्री तारा
गुरुवारी (दि. २५ ) श्री मातंगी
शुक्रवारी (दि.२६ ) श्री भुवनेश्वरी
शनिवारी (दि.२७ ) अंबारीतील पूजा
रविवारी (दि.२८ ) श्री षोडशी त्रिपुरसुंदरी, पुढील सोमवारी (दि.२९ ) श्री महाकाली
मंगळवारी (दि.३० ) श्री महिषासुरमर्दिनी
बुधवारी (दि. १ ) श्री भैरवी आणि
गुरुवारी (दि. २ ) रथारुढ पूजा बांधण्यात येणार आहेत.ML/ML/MS