पाण्याचं महत्त्व नेहमी लक्षात ठेवा

मुंबई, दि. (एमएमसी न्यूज नेटवर्क): घरात पाण्याची गळती होणार नाही याची काळजी घ्या. घरातले बिघडलेले नळ आणि पाईप दुरुस्त करून घ्या.
गावात असाल, तर जलसंधारणाच्या कामात सहभागी होणं, शहरात असाल तर इमारतीत पावसाचं पाणी साठवण्याची व्यवस्था करणं (रेनवॉटर हार्वेस्टिंग) अशा गोष्टी तुम्ही करू शकता.
शेती किंवा उद्योग व्यवसाय करत असाल तर त्यात पाण्याचा कमी वापर आणि पुनर्वापर करण्यावर भर द्या. धरणं, झरे, विहिरी अशा पाण्याच्या नैसर्गिक स्त्रोतांमध्ये आपल्यामुळे प्रदूषण होणार नाही, याची काळजी घ्या. Always remember the importance of water
ML/KA/PGB
Sep 2023