पोलिसांना घरांचे वाटप
अहमदनगर, दि. १२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कर्जत व जामखेड येथील पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या प्रत्येकी 38 अशा एकूण 76 नवीन निवासस्थानांचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज दुपारी लोकार्पण करण्यात आले. त्यांनी पोलीस निवासस्थानांची पाहणी केली.
पोलीस कर्मचारी व बँड पथकातील कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. एकूण 15 कोटी 21 लाख रुपये खर्चून ही निवासस्थाने बांधण्यात आली आहेत.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरुपात पोलिस नाईक संभाजी वाबळे व पोलीस शिपाई ईश्वर माने यांना 2 बीएचके सदनिकेच्या चाव्या हस्तांतरित करण्यात आल्या.
महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या देऊळवाडी (ता. कर्जत) येथील 400/220 के.व्ही. केंद्राचेही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते यावेळी ऑनलाईन लोकार्पण करण्यात आले.
राज्याच्या अर्थसंकल्पात मानधनात भरीव वाढ केल्याबद्दल अंगणवाडी सेविका मदतनीस, आशा सेविका आणि कोतवाल यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांचा यावेळी सत्कार केला.
ML/KA/SL
12 March 2023