केटी पेरीसह ६ जणी पोहोचल्या अंतराळात, ब्लू ओरिजिनचं ऑल वुमन मिशन यशस्वी

अमेरिकन अब्जाधीश जेफ बेझोस यांच्या ब्लू ओरिजिन कंपनीने मिशन एनएस-३१ यशस्वीरित्या पूर्ण करून इतिहास रचला आहे. पहिल्यांदाच ६ महिलांनी सोमवारी ब्लू ओरिजिनच्या न्यू शेपर्ड रॉकेटवरून एकत्र अंतराळ प्रवास केला. या मोहिमेचे नाव ‘ऑल वुमन मिशन’ असं होतं. यामध्ये प्रसिद्ध हॉलिवूड गायिका केटी पेरी आणि अमेरिकन अब्जाधीश जेफ बेझोस यांची प्रेयसी लॉरेन सांचेझ यांचा समावेश टिममध्ये होता. टेक्सासमधील व्हॅन हॉर्न लाँच पॅडवरून संध्याकाळी ७ वाजता रॉकेटने उड्डाण केले. सुमारे ११ मिनिटांनी मिशन परतले. हे रॉकेट सुमारे १०५ किलोमीटर उंचीवर पोहोचले, तेव्हा महिला प्रवाशांना काही मिनिटांसाठी गुरुत्वाकर्षणाचा अनुभव आला.