जालना कृषी उत्पन्न बाजार समितीतील सर्व व्यवहार आज बंद…
जालना दि १:– जमिनीला योग्य भाव मिळत नसल्याच्या निषेधार्थ जालना कृषी उत्पन्न बाजार समितीतील सर्व व्यवहार आज बंद राहणार आहेत. जालना कृषी उत्पन्न बाजार समितीतील भुसार मार्केट, गुळ मार्केट, होलसेल किराणा मार्केट तसेच भाजी मार्केट हे आज बंद ठेवण्यात येणार आहे.
जालना – नांदेड समृध्दी महामार्गात गेलेल्या जमिनीला योग्य भाव मिळत नसल्याने जालना – नांदेड समृद्धी महामार्ग बाधित शेतकऱ्यांनी जालना तालुक्यातील देवमूर्ती येथे धरणे आंदोलन सुरू केले आहे. शेतकऱ्यांच्या या धरणे आंदोलनाला पाठींबा म्हणून जालना कृषी उत्पन्न बाजार समितीतील सर्व व्यवहार आज बंद ठेवण्यात येणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपला शेतमाल बाजारात विक्रीसाठी आणू नये असे आवाहन जालना कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सचिवांनी केले आहे.