अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजाची राजकारणात एंट्री

भारतीय क्रिकेट संघाचा अनुभवी अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाने राजकारणात प्रवेश केला आहे. तो भारतीय जनता पक्षाचा सदस्य झाला आहे. जडेजाची पत्नी रिवाबा जडेजा ही गुजरातच्या जामनगरमधून भाजपची आमदार आहे. रिवाबाने नुकतीच जडेजाबद्दलची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर केली आहे. तिने एका पोस्टद्वारे सांगितले की, रवींद्र जडेजाने भाजपचे सदस्यत्व घेतले आहे.