अष्टपैलू क्रिकेटपटूला सामन्यादरम्यान दुखापत
पुणे, दि. १९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : विश्वचषकाच्या १७व्या सामन्यात भारत आणि बांगलादेशचे संघ आमनेसामने आले आहेत. दोन्ही संघांमधील हा सामना पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळला जात आहे. बांगलादेशचा कर्णधार नझमुल हुसेन शांतोने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. भारतीय संघ प्रथम गोलंदाजी करायला उतरला. टीम इंडियाला नवव्या षटकात मोठा धक्का बसला. अष्टपैलू हार्दिक पांड्याला सामन्यादरम्यान दुखापत झाली.
वैद्यकीय तज्ज्ञांनी केलेल्या तपासणी नंतर पांड्या स्टेडीअममध्ये परतला आहे. गरज असल्यास तो फलंदाजी करू शकतो, अशी माहिती मिळत आहे.
SL/KA/SL
19 Oct. 2023