अकोल्यात झाले अखिल भारतीय राष्ट्रीय मराठी गजल संमेलन
अकोला, दि. 07 (एमएमसी न्यूज नेटवर्क): कविता, गजल ही माणसाच्या सुखा दुखःविषयी बोलत असते म्हणूनच ती जीवनाला समृध्द करते, गजलेचा आशय हा हृदयाला भिडतो म्हणूनच कवी, गजकार हे समाज मनाचा हुंकार मांडत असतात असे प्रतिपादन सुप्रसिध्द सिने दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी केले.All India National Marathi Ghazal Conference held in Akola
अकोल्यात पहिल्यादांच आयोजित अखिल भारतीय गजल समेलनाचे उद्घाटक म्हणून बोलत होते. यावेळी नागराज मंजुळे यांनी 1995 मधे पोलीस प्रशिक्षणासाठी अकोला येथे निवड झाल्याची आठवण केली
गजलसागर प्रतिष्ठान व तिष्नगत मल्टीपर्पज सोसायटी यांच्या विद्यमाने अकोल्यात 2 दिवसीय अखिल भारतीय गजल संमेलनाचे आयोजन करण्यात आले असून संमेलानाची सुरवात गजल दिंडीने झाली . विभागीय आयुक्त डॉ.दिलिप पांढरपट्टे यांच्या अध्यक्षतेत दोन दिवस पार पडणाऱ्या गजल संमेलनामधे विविध गजल संग्रहाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी गजल विषयात पीएचडी डॉ. भाग्यश्री पांचाळे, डॉ राहूल भोरे यांचा सन्मान करण्यात आला.All India National Marathi Ghazal Conference held in Akola
यावेळी बोलतांना संमेलनाध्यक्ष डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी प्रत्येक गजल सप्तरंगी इंदरधनुष्यासारखी असते. ती जीवन जगायला शिकवते असे प्रतिपादन केले.यावेळी गजल नवाज भिमराव पांचाळे यांचेसह मान्यवरांची उपस्थिती होती.
दोन दिवसीय चालणाऱ्या गजल संमेलनामध्ये राज्यासह इतर राज्यातील गजलकार उपस्थित असून संमेलनात परिसंवाद, मुशायरे, गजल गायन मैफिली, गजलवर मुक्तचर्चा, गझल संगम , बहुभाषी गजल मुशायरा असे विविध कार्यक्रम पार पडणार आहेत.
ML/KA/PGB
07 Jan. 2023