नाशिकमध्ये अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य संमेलन

 नाशिकमध्ये अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य संमेलन

मुंबई, दि. 24 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य परिषदेचे वतीने नाशिक शहरात २८ व २९ जानेवारी २०२३ रोजी ९ वे अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे.All India Muslim Marathi Literary Conference in Nashik या संमेलनाच्या अध्यक्षपदी महाराष्ट्र राज्यातील प्रसिद्ध विचारवंत, ज्येष्ठ साहित्यिक अब्दुल कादर मुकादम यांची निवड करण्यात आली असल्याची माहिती परिषदेतर्फे हसीब नदाफ आणि डॉ.युसूफ बेन्नूर यांनी आज मुंबई प्रेस क्लब मध्ये दिली.

नाशिक येथील कर्मवीर दादासाहेब गायकवाड सभागृह, भाभा नगर, मुंबई नाका येथे हे संमेलन आयोजित करण्यात आले आहे. या संमेलनाची नाशिक शहरात मोठ्‌या प्रमाणात तयारी सुरू झालीअसून,राज्यातील विविध जिल्ह्यातील एक हजार साहित्यिक उपस्थित राहतील असा विश्वास कामगार नेते शेख ईरफान रशिद यांनी व्यक्त केला. या साहित्य संमेलनात स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात मुस्लिमः प्रश्न वास्तव आणि अपेक्षा, मुस्लिम मराठी साहित्य चळवळीची तीन दशके एक साहित्यिक, सांस्कृतिक व सामाजिक विश्लेषण, आम्ही भारताचे लोक भारताचे लोक, सांस्कृतिक दहशतवाद, मुस्लिम मराठी साहित्याचा प्रवाह आणि नवी दिशा या विषयावर वैचारिक मंथन होणार आहे.

ML/KA/PGB
24 Nov .2022

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *