पाकिस्तानने विक्रीस काढल्या सर्व सरकारी कंपन्या

 पाकिस्तानने विक्रीस काढल्या सर्व सरकारी कंपन्या

इस्लामाबाद, दि. १४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पाकीस्तान सध्या भयंकर आर्थिक ओढग्रस्तीतून जात आहे. महागाई आणि बेरोजगारी विरोधात आता येथील जनताही रस्त्यावर उतरली आहे. पाकव्याप्त काश्मीरमधील जनता आझादीचे नारे देत आहे. देशाच्या स्थापनेपासूनच केवळ लष्करी सामर्थ्याकडे लक्ष देणाऱ्या आणि आर्थिक घडी न बसवणाऱ्या राजकारण्यांच्या डावपेचाचे गंभीर परिणाम येथील सर्वसामान्य नागरिक भोगत आहेत. पाकचे नवनियुक्त पंतप्रधान शाहबाज शरीफ यांचे सरकार या परिस्थितीवर मात करण्याचा प्रयत्न करत आहे. आर्थिक संकट आणि IMF च्या कठोर अटींचा सामना करत असलेल्या पाकिस्तानने सर्व सरकारी कंपन्या विकण्याचा निर्णय घेतला आहे. आज इस्लामाबादमध्ये झालेल्या खासगीकरण आयोगाच्या बैठकीत पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी याची घोषणा केली. ते म्हणाले, “व्यवसाय करणे हे सरकारचे काम नाही, देशात व्यवसाय आणि गुंतवणुकीसाठी चांगले वातावरण उपलब्ध करून देणे हे सरकारचे काम आहे.

शरीफ म्हणाले की, सर्व सरकारी कंपन्या नफा कमावत असोत किंवा नसोत त्या विकल्या जातील. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सरकार केवळ अशाच कंपन्यांना कायम ठेवणार आहे ज्या धोरणात्मकदृष्ट्या महत्त्वाच्या आहेत. ही प्रक्रिया सुलभ करण्यासाठी सर्व मंत्र्यांनी खाजगीकरण आयोगाला सहकार्य करण्याचे आवाहन पंतप्रधानांनी केले आहे. पाकिस्तानच्या अर्थ मंत्रालयाच्या डिसेंबर २०२३ च्या अहवालानुसार, पाकिस्तानमध्ये ८८ सरकारी कंपन्या आहेत.

कंपन्यांच्या विक्रीची प्रक्रिया पारदर्शकतेने पूर्ण केली जाईल, असे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी म्हटले आहे. सर्वप्रथम, पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्स कंपनी लिमिटेडचे ​​खाजगीकरण केले जाईल. बोली लावली जाईल आणि त्याचे थेट प्रक्षेपण टीव्हीवर होईल.

SL/ML/SL

14 May 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *