फक्त १०० रुपयांत पाहता येणार आमिर खानचे सर्व चित्रपट

 फक्त १०० रुपयांत पाहता येणार आमिर खानचे सर्व चित्रपट

मुंबई, दि. ३० : आमिर खानने आपल्या चाहत्यांसाठी एक आगळीवेगळी भेट घेऊन आलेला आहे. ‘आमिर खान टॉकीज – जनता का थिएटर’ हे त्याचे नवे यूट्यूब चॅनल सुरु झाले असून, या माध्यमातून प्रेक्षकांना त्याचे जुने आणि नवीन चित्रपट फक्त ₹१०० मध्ये ‘पे पर व्ह्यू’ तत्त्वावर पाहण्याची संधी मिळणार आहे. १ ऑगस्टपासून ‘सितारे जमीन पर’ या चित्रपटाद्वारे या योजनेचा शुभारंभ होणार असून, पुढील काळात ‘थ्री इडियट्स’, ‘दंगल’, ‘लगान’ यांसारखे दर्जेदार चित्रपटही या चॅनलवर उपलब्ध होणार आहेत. ही सुविधा भारतासह ३८ देशांमध्ये उपलब्ध असेल आणि सर्व चित्रपटांमध्ये सबटायटल्स असतील, जेणेकरून भाषेचा अडथळा न राहता सर्वच प्रेक्षक या चित्रपटांचा आनंद घेऊ शकतील.

या उपक्रमाबाबत बोलताना आमिर खानने सांगितले की, चित्रपटगृहात पोहोचू शकणाऱ्या प्रेक्षकांपुरतेच चित्रपट मर्यादित न राहता, प्रत्येक घरात तो सहज पोहोचावा – हाच मुख्य उद्देश आहे. यासाठी यूट्यूब हे अधिक प्रभावी माध्यम असल्याचे त्याचे म्हणणे आहे. ओटीटी प्लॅटफॉर्मवर चित्रपट विकण्याऐवजी, यूट्यूबच्या माध्यमातून एका क्लिकवर लोकांपर्यंत या चित्रपटांचा अनुभव घेता येईल. संपूर्ण कुटुंबासह एकत्र बसून उच्च दर्जाचे चित्रपट पाहण्याची ही एक सुरेख संधी असल्याने ‘जनता का थिएटर’ हा उपक्रम प्रेक्षकांसाठी नव्या पर्वाची सुरुवात ठरेल.

SL/ML/SL

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *