अमेरिकेत विमान आणि लष्करी हेलिकॉप्टरच्या धडकेत सर्व ६७ प्रवासी मृत्यूमुखी

 अमेरिकेत विमान आणि लष्करी हेलिकॉप्टरच्या धडकेत सर्व ६७ प्रवासी मृत्यूमुखी

वॉशिग्टन डी.सी., दि. ३० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन डीसीमध्ये बुधवारी रात्री नऊच्या सुमारास एक प्रवासी विमान आणि हेलिकॉप्टरची टक्कर झाली. अपघातानंतर दोघेही पोटोमॅक नदीत पडले. विमानात 4 क्रू मेंबर्ससह 64 लोक होते. हेलिकॉप्टरमध्ये 3 जण होते. या सर्व 67 लोकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. वॉशिंग्टन अग्निशमन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, रोनाल्ड रीगन विमानतळाजवळ ही घटना घडली. यूएस एअरलाइन्सचे CRJ700 बॉम्बार्डियर जेट आणि लष्कराचे ब्लॅक हॉक (H-60) हेलिकॉप्टर यांच्यात हा अपघात झाला. अमेरिकन एअरलाईन्सचे विमान कॅन्सस राज्यातून वॉशिंग्टनला येत होते.

अपघातानंतर अमेरिकन एअरलाइन्सच्या विमानाचे पोटोमॅक नदीत तीन तुकडे पडलेले आढळले. सीबीएस न्यूजनुसार, आतापर्यंत 30 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. वॉशिंग्टन अग्निशमन विभागाचे प्रमुख जॉन डोनेली यांनी या दुर्घटनेवर दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, तेथे कोणीही वाचेल अशी त्यांची अपेक्षा नाही. जॉन डोनेली यांनी सांगितले की, पाण्यात शोध आणि बचाव कार्य सुरू आहे. पाणी खूप खोल आणि गढूळ आहे. त्यामुळे रेस्क्यू ऑपरेशनमध्ये अडचणी येत आहेत. सध्या विमानतळावर सर्व उड्डाणे आणि लँडिंग थांबवण्यात आले आहे.

SL/ML/SL

30 Jan 2025

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *