गोसेखुर्द धरणाचे सर्वच्या सर्व 33 दरवाजे उघडले…

 गोसेखुर्द धरणाचे सर्वच्या सर्व 33 दरवाजे उघडले…

भंडारा, दि. १७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : या पावसाळ्यामध्ये पहिल्यांदाच आज गोसेखुर्द धरणाचे संपूर्ण 33 ही दरवाजे उघडण्यात आलेले आहेत. अर्धा मीटरने उघडलेल्या या दारामधून 1 लाख 31 हजार 881 क्युसेक पाण्याचा विसर्ग होत आहे. त्यामुळे नदीकाठांच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे.

भंडारा जिल्ह्याला आज आणि उद्या दोन्ही दिवस ऑरेंज अलर्ट हवामान खात्यातर्फे घोषित करण्यात आलेला आहे. कालही भंडारा तालुक्यात 88 मिलिमीटर एवढा पाऊस पडला त्यामुळे भंडारा शहरातील काही सखल भागांच्या घरांमध्ये आणि दुकानांमध्ये पाणी शिरले होते. गोंदिया जिल्ह्याच्या पुजारी टोला चे आठ दार उघडण्यात झाले असून धापेवाडा धरण ओव्हर फ्लो होवून वाहत आहे.

दोन्ही जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट घोषित केल्याने जिल्ह्यात पूर परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून तसेच गोसे धरणाची सध्याची पाणी पातळी ही 243.500 असून हे पाणी पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी गोसे धरणाचे 33 ही दार अर्ध्या मिटर ने उघडण्यात आलेले आहेत.

ML/KA/SL

17 July 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *