‘शक्ती’ चक्रीवादळामुळे कोकण किनारपट्टीला सतर्कतेचा इशारा

मुंबई, दि. 4 : अरबी समुद्रात निर्माण झालेले ‘शक्ती’ (Shakhti) चक्रीवादळ आता अधिक तीव्र झाले असून त्याचे रूपांतर ‘तीव्र चक्रीवादळी वादळ’ (Severe Cyclonic Storm) मध्ये झाले आहे. पालघर जिल्ह्यासह मुंबई, ठाणे, रायगड , सिंधुदुर्ग येथे सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. या काळात जिल्ह्याच्या समुद्रकिनारपट्टी भागात वादळी वारे वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 4 ते 7 ऑक्टोबर दरम्यान जिल्ह्यातील किनारपट्टी भागात 50 ते 60 किलोमीटर प्रति तास वेगाने वादळी वारे वाहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आला आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, हे वादळ भारताच्या किनाऱ्यापासून दूर जात असल्याने भूस्खलनाचा (Landfall) धोका नाही, मात्र किनारी भागांमध्ये सोसाट्याचे वारे आणि समुद्रात रौद्र स्थिती कायम राहील.
IMD च्या संकेतस्थळावर दिलेल्या माहितीनुसार,
“शक्ति” हे तीव्र चक्रीवादळ वायव्य आणि लगतच्या भागातून आले आहे. ईशान्य अरबी समुद्र गेल्या ६ तासांत १३ किमी प्रतितास वेगाने पश्चिम-नैऋत्येकडे सरकले आहे. आज, ४ ऑक्टोबर २०२५ रोजी भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी २ वाजता त्याच प्रदेशावर केंद्रीत झाले आहे. ते २१.८° उत्तर अक्षांश आणि ६३.८° पूर्व रेखांशावर आहे. ते द्वारकेच्या पश्चिमेस सुमारे ५५० किमी, नालियाच्या पश्चिमेस ५४० किमी, कराची (पाकिस्तान) च्या नैऋत्येस ४८० किमी, रस अल हद्दच्या पूर्वेस ४२० किमी आणि मसिराह (ओमान) च्या पूर्वेस ५२० किमी अंतरावर आहे.
ते पश्चिम-नैऋत्येकडे सरकण्याची शक्यता आहे आणि ५ ऑक्टोबरपर्यंत वायव्य आणि लगतच्या पश्चिमेस मध्य-अरबी समुद्रात पोहोचेल. त्यानंतर, ते पुन्हा वळेल.
हवामान विभागाने अरबी समुद्रात मासेमारी करणाऱ्यांनाही इशारा दिलाय. त्यांनी 4 ते 7 ऑक्टोबर या कालावधीमध्ये वायव्य अरबी समुद्र, त्याला लागून असलेला ईशान्य अरबी समुद्राचा भाग, मध्य अरबी समुद्र आणि गुजरात-उत्तर महाराष्ट्र किनारपट्टी तसेच समुद्रात जाऊ नये, असे हवामान विभागानं स्पष्ट केलं आहे.
काढणीस तयार झालेल्या उन्हाळी भाताची कापणी शक्यतो 10 ऑक्टोबरनंतर पावसाचा अंदाज बघून करावी, असा सल्ला जिल्हा कृषी हवामान केंद्र, कृषी विज्ञान केंद्र कोसबाड मार्फत शेतकऱ्यांना देण्यात आला आहे.
SL/ML/SL 4 Oct. 2025