अक्षय कुमार-शिल्पा शेट्टी ३१ वर्षांनी आले एकत्र, दोघांनी काय केलं पाहा!

 अक्षय कुमार-शिल्पा शेट्टी ३१ वर्षांनी आले एकत्र, दोघांनी काय केलं पाहा!

मुंबई, दि. 4 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :अक्षय कुमारचं असंख्य अभिनेत्रींशी नाव जोडलं गेलं होतं. त्याचा आणि रवीना टंडनचा साखरपुडाही झाला होता. पण हे नातं टिकलं नाही. नंतर त्याचं नाव शिल्पा शेट्टीशी जोडलं गेलं.अक्षय व शिल्पा यांनी ‘मैं खिलाडी तू अनाड़ी’ या चित्रपटात काम केलं होतं. हा चित्रपट ३१ वर्षांपूर्वी म्हणजेच १९९४ मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटानंतर हे दोघेही कधीच एकत्र स्क्रीनवर झळकले नाही. पण आता या दोघांचा एक व्हिडीओ समोर आला आहे. अक्षय- शिल्पा सोमवारी एका अवॉर्ड सोहळ्यात गेले होते. तिथे ते समोरासमोर आले आणि मग स्टेजवर पोहोचले. दोघांनी एकत्र परफॉर्म केलं. तो व्हिडिओ आता व्हायरल झाला आहे. ३१ वर्षांनी दोघांनी एकत्र परफॉर्म केलं आहे.

ML/ML/PGB 3 Jan 2025

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *