अकोल्यात अतिवृष्टी,
१५० घरांचे अंशतः नुकसान

अकोला दि २३:– अकोला जिल्ह्यात बाळापूर तालुक्यातील बाळापूर, पारस, पातूर तालुक्यातील चान्नी आणि सस्ती या मंडळांमध्ये मुसळधार पाऊस कोसळला, या भागात मध्यरात्रीपासून मुसळधार कोसळल्याने गावांमधील अनेक घरांत पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे.
गत पंधरा दिवसांपासून दडी दिलेल्या पावसाने बाळापूर व पातूर तालुक्यात जोरदार हजेरी दिली. बाळापूर मंडळात रात्रीच्या दरम्यान १७७.३ मिमी, पारस मंडळात ८२ मिमी, पातूर तालुक्यातील चान्नी मंडळात ७५ मिमी, सस्ती मंडळात ७५.५ मिमी पाऊस झाला. शेतात पाणी साचल्याने सोयाबीन, कपाशी, तुरीच्या पिकांना फटका बसला आहे. ML/ML/MS