अकोल्यात पारस बॅरेजचे गेट उघडले , सतर्कतेचा इशारा

अकोला दि २३:– अकोल्याच्या बाळापूर तालुक्यातील पारस येथील मन नदीवरील बॅरेजचे दोन गेट 6100 क्यूसेक्सने उघडले आहेत. पातूर तालुक्यात जोरदार पाऊस झाल्याने मन नदीत पूर परिस्थिती निर्माण झाल्याने, ह्या बॅरेजचे दोन दरवाजे उघडण्यात आले आहेत. काल पारस येथे ढगफुटी सदृशय पाऊस झाल्याने मोठे नुकसान झाले होते. तर आता काल रात्री झालेल्या पावसामुळे बॅरेजचे गेट उघडण्यात आले आहेत. नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. बॅरेजचे दोन गेट उघडल्याने बाळापूर शहराला जोडणाऱ्या पुलावरून पाणी वाहत असल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. ML/ML/MS