७० वर्षांच्या आजोबांनी ७३ वर्षांच्या आजीला दिला घटस्फोट, पोटगी किती दिली ते वाचा

पंजाब, दि. 18 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पंजाबमधील कर्नालमध्ये एका ७० वर्षांच्या आजोबांनी ७३ वर्षीय आजीला घटस्फोट दिला आहे. लग्नाच्या 44 वर्षानंतर या जोडप्याचा घटस्फोट झाला. आजोबांना आजीला 3 कोटींपेक्षा जास्त रकमेची पोटगी द्यावी लागली आहे. एवढ्या मोठ्या रकमेची व्यवस्था करण्यासाठी आजोबांनी आपली शेतजमीनही विकली. पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाच्या मध्यस्थी केंद्रात हा निर्णय घेण्यात आला.
ML/ML/PGB
18 Dec 2024