६५०० हून अधिक व्यवसायांची स्थापना पूर्ण करत ‘अजमान न्यूव्हेंचर्स सेंटर फ्री झोन’चा एक वर्षाचा यशस्वी प्रवास
मुंबई प्रतिनिधी: ‘अजमान न्यूव्हेंचर्स सेंटर फ्री झोन’ (एएनसीएफझेड)ने आपल्या पहिल्या वर्षात ६५०० पेक्षा अधिक व्यवसायांची नोंदणी करून एक उल्लेखनीय टप्पा गाठला आहे. ऑक्टोबर २०२४ मध्ये स्थापना झालेल्या या डिजिटल-प्रथम फ्री झोनने अल्पावधीत संयुक्त अरब अमिरातीतील सर्वाधिक गतिशील, गुंतवणूकदार-अनुकूल आणि तंत्रज्ञानाधारित व्यवसाय केंद्र म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.
मुंबईत आयोजित संवाद कार्यक्रमात एएनसीएफझेडचे CEO ऋषी सोमैया, ऑपरेशन्स डायरेक्टर नासेर अल खनबाशी, आणि फायनान्स डायरेक्टर मोहम्मद फाथी यांनी भारतीय उद्योजक व माध्यम प्रतिनिधींशी परस्परसंवाद साधला. ही अजमान प्रतिनिधीमंडळाची भारतातील पहिली अधिकृत भेट ठरली.
या भेटीदरम्यान प्रतिनिधींनी सांगितले की,
“एएनसीएफझेडमधील नव्या स्थापनांपैकी तब्बल ४०–४५% कंपन्या भारतीय उद्योजकांच्या आहेत. भारतीय व्यवसायांचा मजबूत सहभाग हा आमच्यासाठी मोठा विश्वासाचा पुरावा आहे. आमचे पुढील उद्दिष्ट २०२६ पर्यंत एकूण १०,००० कंपन्यांची नोंदणी पूर्ण करणे हे आहे.”
एएनसीएफझेडने स्थापनेपासूनच पूर्णपणे डिजिटल सेवा मॉडेल अंगीकारले आहे. गुंतवणूकदारांना २ तासांत व्यवसाय परवाना, २४ तासांत व्हिसा प्रक्रिया, अखंड डिजिटल पोर्टल आणि सर्व प्रशासकीय कामांसाठी समर्पित सपोर्ट टीम उपलब्ध आहे. या सुलभ, वेगवान आणि पारदर्शक प्रक्रियांमुळे अजमान हे नव्या पिढीच्या उद्योजकांसाठी आकर्षणकेंद्र ठरले आहे.
एएनसीएफझेडचे अध्यक्ष शेख मोहम्मद बिन अब्दुल्ला अल नुआइमी म्हणाले,
“ही कामगिरी ‘अजमान व्हिजन २०३०’शी सुसंगत आहे. एका वर्षात इतक्या मोठ्या प्रमाणावर कंपन्या स्थापन होणे हे जागतिक उद्योजकांच्या आमच्यावर असलेल्या विश्वासाचे द्योतक आहे.”
मुख्य कार्यकारी अधिकारी ऋषी सोमैया म्हणाले,
“सहज, पारदर्शक आणि तंत्रज्ञानाधारित प्रणालीद्वारे उद्योजकांना सक्षम करणे हे आमचे ध्येय आहे. पहिल्या वर्षातील उल्लेखनीय वाढीनंतर डिजिटल सेवांचा विस्तार आणि जागतिक पोहोच वाढविण्याची आमची गती अधिक वेगवान होणार आहे.”
फायनान्स डायरेक्टर मोहम्मद फाथी आणि ऑपरेशन्स डायरेक्टर नासेर अल खनबाशी यांनीही भारतीय उद्योजकांचा वाढता सहभाग एएनसीएफझेडसाठी रणनीतीदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा असल्याचे अधोरेखित केले.
सध्या एएनसीएफझेडमध्ये १५० हून अधिक देशांतील गुंतवणूकदार कार्यरत आहेत. कृत्रिम बुद्धिमत्ता, ब्लॉकचेन, डिजिटल गेमिंग, क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी यांसारख्या उदयोन्मुख क्षेत्रांपासून ते पारंपरिक व्यवसायांपर्यंत विविध उद्योगांना हा फ्री झोन प्रभावी प्लॅटफॉर्म प्रदान करतो.
२०२४ मध्ये अजमान अमिरातीच्या शासकांद्वारे स्थापन झालेला ‘अजमान न्यूव्हेंचर्स सेंटर फ्री झोन’ हा स्पर्धात्मक, सुरक्षित आणि परवडणाऱ्या सुविधा देणारा भविष्याभिमुख, डिजिटल-प्रथम व्यवसाय केंद्र आहे.