उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त येवल्यात आमदार पंकज भुजबळ यांच्या हस्ते वृक्षारोपण

येवला, DI २५ -* राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पार्टीच्या वतीने राज्यभरात जनविश्वास सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या जनविश्वास सप्ताहाच्या निमित्ताने राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे विधान परिषदेचे आमदार पंकज भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत आज येवला शहरातील जनता विद्यालयात, अंगणगाव येथील मायबोली संस्था व उपजिल्हा रुगणालय परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. तसेच आमदार पंकज भुजबळ यांच्या हस्ते येवला उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना तसेच मायबोली शाळेतील मुकबधीर विद्यार्थ्यांना फळांचे वाटप करण्यात आले.
यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राधाकिसन सोनवणे, राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे येवला विधानसभा अध्यक्ष वसंत पवार, अल्पसंख्यांक आयोगाचे सदस्य हुसेन शेख, तालुकाध्यक्ष साहेबराव मढवई, पार्टीचे येवला उपाध्यक्ष दत्ता निकम, शहराध्यक्ष दिपक लोणारी, प्रा.अर्जुन कोकाटे, अमजद शेख, माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब गुंड, नवनाथ काळे, मच्छिंद्र थोरात, मकरंद सोनवणे, संतोष खैरनार, भाऊसाहेब धनवटे, विजय जेजुरकर, भूषण लाघवे, सचिन सोनवणे, सुमित थोरात, दीपक पवार यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.
यावेळी आमदार पंकज भुजबळ म्हणाले की, राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभरात जनविश्वास सप्ताह राबविण्यात येत आहे. यानिमित्ताने विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहे. यामाध्यमातून वृक्षारोपण मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेत सर्वांनी सहभागी होऊन जास्तीत जास्त वृक्ष लागवड करण्यात यावी. तसेच नागरिकांच्या विविध अडीअडचणी सोडविण्याचे काम पदाधिकारी कार्यकर्त्यांनी करावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले. KK/ML/MS