अजित पवार यांनी घेतली उपमुख्यमंत्री पदाची शपथ

 अजित पवार यांनी घेतली उपमुख्यमंत्री पदाची शपथ

मुंबई, दि. 2 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत त्यांनी आपल्यासह आपल्या नऊ सहकाऱ्यांसह आज दुपारी राजभवनावर मंत्रिपदाची शपथ घेतली.Ajit Pawar took oath as Deputy Chief Minister

त्यांना राज्यपाल रमेश बैस यांनी राजभवनातील दरबार हॉलमध्ये पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.
आज मंत्रिपदाची शपथ घेतलेल्यांमध्ये छगन चंद्रकांत भुजबळ, दिलीप दत्तात्रय वळसे- पाटील, हसन मियालाल मुश्रीफ, धनंजय पंडितराव मुंडे, धर्मरावबाबा भगवंतराव आत्राम, आदिती सुनील तटकरे, संजय बाबूराव बनसोडे, अनिल भाईदास पाटील यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली.

यावेळी विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य, विधानसभेचे सदस्य, लोकप्रतिनिधी आदी उपस्थित होते.

ML/KA/PGB
2 July 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *