अजित पवारांनी घेतला सभागृहात क्लास

 अजित पवारांनी घेतला सभागृहात क्लास

नागपूर, दि. ३० ( एमएमसी न्यूज नेटवर्क) : हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी आज अजित पवारांनी सभागृहात क्लास घेत अध्यक्षा पासून मुख्यमंत्री , मंत्र्यांना चांगलेच धारेवर धरले.

सकाळी लक्षवेधीच्या वेळी अनुपस्थितीत असलेल्या मंत्री गिरीश महाजन यांच्या वर टीका करीत असे चालणार नाही म्हटले, अध्यक्षांना उद्देशून त्यांनी तुम्ही का बोलत नाही असे विचारले, आमदार सभागृहात वर्तमान पत्र वाचतात , मंत्री चर्चेसाठी हजर राहत नाही यावर भूमिका घ्या असा सल्ला त्यांनी अध्यक्ष राहूल नार्वेकर यांना दिला.

त्यांनी संध्याकाळी अंतिम आठवडा प्रस्तावावर उत्तर दिलेल्या मुख्यमंत्र्यांनाही त्यांनी सुनावले, आज सहा महिने झाले… आता त्यातून बाहेर पडा तुमच्या त्या राजकीय गोष्टीशी आम्हाला काही घेणं-देणं नाही.

मुख्यमंत्री शिंदे यांनी उत्तर देताना माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडत त्याना आव्हानही दिले. मुख्यमंत्र्यांच्या उत्तरानंतर अजित पवार यांनी राईट टू रिप्लाय अंतर्गत मुख्यमंत्र्यांच्या एकूणच भाषणावरून त्यांना चांगलेच सुनावले.

त्यामुळे ज्या जोरदारपणे यावेळी बोलताना विरोधी पवार म्हणाले, आज तुम्ही मुख्यमंत्री झालात त्याला सहा महिने पूर्ण झाले. या सहा महिन्यात तुम्ही जेव्हा जेव्हा भाषणे करता, त्यावेळी तुम्ही थोड्याफार फरकाने हेच मुद्दे मांडता.

आता तुम्ही राज्यातील १३ कोटी जनतेचे मुख्यमंत्री आहात, या राज्याचे प्रमुख आहात. त्यामुळे यातून तुम्ही बाहेर पडा असे असा सल्ला मुख्यमंत्र्यांना दिला. तुम्ही ज्या पक्षातून पासून आलात त्याच्या वर्तमान पत्रात लिहिले गेले त्यावर इथे का बोलता असा सवाल पवारांनी केला.

ML/KA/SL

30 Dec. 2022

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *