अजित पवार गटाचे तब्बल 200 पानी उत्तर विधिमंडळाला सादर…

 अजित पवार गटाचे तब्बल 200 पानी उत्तर विधिमंडळाला सादर…

मुंबई, दि. 16 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या विधान परिषदेच्या आमदारानी मंगळवारी विधिमंडळात झालेल्या सुनावणीच्या वेळी तब्बल दोनशे पानांचे आपले म्हणणे दाखल केले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांच्या अपात्रतेबाबत आज विधानपरिषद उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे यांनी त्यांना आपले म्हणणे मांडण्याची दिलेली मुदत आज संपली त्यावेळी त्यांनी हे म्हणणे सादर केले.

राजकीय घडामोडी होण्यापूर्वी शरद पवार यांच्या गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आमदार अमोल मिटकरी, आमदार अनिकेत तटकरे,आमदार विक्रम काळे,आमदार सतीश चव्हाण तर जितेंद्र आव्हाड यांनी रामराजे नाईक निंबाळकर यांना अपात्र करण्या संदर्भात नोटीस बजावली होती. त्यानंतर अजित पवार गटाकडून या नोटीशी साठी मुदतवाढ मागविण्यात आली. 16 जानेवारी पर्यंत आपले म्हणणे सादर करण्यासंदर्भात उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी नोटीस दिल्यानंतर मंगळवारी त्यांच्यासमोर वकिलामार्फत विधान परिषदेच्या आमदारांनी आपले म्हणणे मांडले.

तब्बल 200 पानाच्या या उत्तरात पक्ष आणि पक्षचिन्ह अजित पवार गटाकडे का राहावे याची कारणे आणि पुरावे जोडण्यात आले आहेत..निवडणूक आयोग लवकरच योग्य तो निर्णय देईल, आम्ही जे म्हणणे निवडणूक आयोगासमोर मांडले आहे,तेच विधानपरिषद उपसभापती यांच्यासमोर सादर केले असून आम्हीच मूळ पक्ष आहोत हे सिद्ध करणारी कारणे ही त्यात दिली आहेत असे अमोल मिटकरी यांनी सांगितले.

दरम्यान विधानसभेत ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांच्या अपात्रतेसाठीची सुनावणी आज झाली त्यातही निवडणूक आयोगासमोर सादर केलेले निवेदनच आपले म्हणणे आहे असे सांगत आयोगाला सादर करण्यात आलेली कागदपत्रे आणि पुरावे आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे देण्यात आले.

Ajit Pawar group
As many as 200 pages of answer submitted to the Legislature…

ML/KA/PGB
16 Jan 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *