अजित पवार यांची राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी निवड

मुंबई, दि. 24 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवनिर्वाचित आमदारांची आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या देवगिरी या शासकीय निवासस्थानी बैठक पार पाडली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या गटनेते पदी अजित पवार यांची निवड करण्याचा निर्णय नवनिर्वाचित आमदारांच्या बैठकीत घेण्यात आला. या बैठकीस अजित पवारांसह पक्षाचे नेते खासदार प्रफुल्ल पटेल, खासदार सुनिल तटकरे, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे यांच्यासह अन्य नेते उपस्थित होते.
ML/ML/PGB 24 Nov 2024