माझ्यावर माध्यमांचे फारच प्रेम , केंद्राच्या राजकारणात रस नाही…..

सातारा, दि. 11 (एमएमसी न्यूज नेटवर्क):आजकाल माझ्यावर माध्यमांचे फारच प्रेम वाढलेले दिसत आहे त्यामुळे माझ्याबद्दल बातम्या येतात मात्र मला केंद्राच्या राजकारणात अजिबात रस नाही असे विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे. ते साताऱ्यात माध्यमांशी बोलत होते.
काल जाहीर झालेल्या आमच्या पक्षाच्या राष्ट्रीय पातळीवरील जबाबदारी बद्दल मी मत स्पष्ट केले होते, मी अजिबात नाराज नाही , माझ्यावर राज्यातील विरोधी पक्षनेता पदाची जबाबदारी सोपविण्यात आलेली आहे असेही पवार यावेळी म्हणाले. मला काल दिल्लीतील कार्यक्रम आटोपल्यावर पुण्यासाठीचे विमान गाठायचे होते त्यामुळे मी घाईने निघालो ,त्यावर ही माध्यमांनी चर्चा केली, पण पुण्यात उतरल्यावर विमानतळावर मी माध्यमांशी बोललोच ना असे अजितदादा यावेळी म्हणाले.
मी राष्ट्रीय पातळीवरील नेता नाही , त्यामुळे कालच्या राष्ट्रीय पातळीवरील बैठकीत मी नव्हतो, मी राज्यभर विविध ठिकाणी फिरतोच आहे, त्यातून पक्षाचे अनेक कार्यक्रम घेतो आहे, मग नाराजी कुठे आहे असा सवालही अजित पवार यांनी यावेळी उपस्थित केला.
ML/KA/PGB 11 Jun 2023