अजितदादांनी केली आपल्या निवृत्तीच्या वयाची घोषणा

 अजितदादांनी केली आपल्या निवृत्तीच्या वयाची घोषणा

बारामती, दि. ११ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : रोखठोक भूमिका घेऊन परखडपणे बोलण्यासाठी प्रसिद्ध असलेले राष्ट्रवादी काँग्रेस नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज त्यांच्या राजकारणातील निवृत्तीच्या वयाबाबत महत्त्वाची माहिती दिली. बारामतीमधल्या प्रचारसभेत बोलताना अजित पवारांनी आपण निवृत्त कधी होणार यावरही भाष्य केलं आहे. ‘साहेब कधी थांबले? मी साहेबांचं ऐकायचं ठरवलं आहे. साहेब 85 ला थांबतील, तेव्हा मी थांबेन. अजून 20 वर्ष आहेत. जोपर्यंत मी चांगला आहे, तोपर्यंत मी काम करत राहीन. जेव्हा होत नाही त्यावेळी बसून ठरवू, कुणाच्या हातात द्यायचं ते’, असं म्हणत अजित पवारांनी आपण 85 व्या वर्षी निवृत्त होणार असल्याचं सांगितलं.

मी कामाचा माणूस आहे. सरकारमध्ये माझं ऐकलं जातं. किती मंत्र्यांच्या मतदारसंघामध्ये निधी येतो? फलटणची काय अवस्था आहे? पुरंदरची काय अवस्था आहे? इंदापूरमध्ये दत्ता मामाला मी पाच वर्षात साडेपाच हजार कोटी दिले. मी 9 हजार कोटी आणले. वाढपी आपल्या तालुक्यातला पंगतीला बसला की जास्त वाढणारच ना. मनुष्य स्वभाव आहे. आईदेखील चौघं जेवायला बसली की लाडक्या लेकाला करंजी घालती, कढी घालती, सगळं घालती. गुपचूप घालती पण देते ना. तसं मी केलं. तुम्ही मला नंबर एकने निवडून दिलं मी नंबर एकचा निधी दिला. लोकसभेला साहेबांना खूश केलं, आता मला खूश करा, असं अजित पवार म्हणाले.

‘माझी विनंती आहे गावचे वाद माझ्या निवडणुकीत काढू नका. विकासाचा विचार करा. साहेबांनी पाच सभा घेतल्या, तेव्हा ते म्हणाले दीड वर्षाने मी थांबणार आहे. साहेब 84 वर्षांचे आहेत, त्यांनीच सांगितलं. मी म्हटलेलं नाही, पुन्हा माझ्या नावावर पावती फाडू नका. जर साहेब नसतील तर कोण बघणार आहे तालुका?’, असा टोला अजित पवारांनी लगावला.

SL/ML/SL

11 Nov. 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *