अवकाळी पाऊस आणि पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी केंद्राकडे

 अवकाळी पाऊस आणि पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी केंद्राकडे

मुंबई दि ११ : राज्यातील अवकाळी पाऊस आणि पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने आतापर्यंत 44 हजार कोटींचं पॅकेज शेतकऱ्यांना दिलं आहे. शेतकऱ्यांना मदतीसाठी सरकारने सर्वतोपरी मदत करण्याचा प्रयत्न केला आहे. यासोबतच केंद्र सरकारकडे 29 हजार कोटी रुपयांच्या मदतीची मागणी देखील केली आहे. केंद्राची मदत लवकरच अपेक्षित असून त्यांचे दुसरे पाहणी पथक पुढील आठवड्यामध्ये राज्यात येण्याची शक्यता आहे अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत दिली. गेले दोन दिवस चाललेल्या पुरवणी मागण्यांवरील चर्चेला ते उत्तर देत होते यानंतर सुमारे 75 हजार कोटींच्या पुरवणी मागण्या विधानसभेत मंजूर करण्यात आल्या.

राज्यात वित्तीय शिस्त ठेवण्याचा प्रयत्न सुरू असून उत्पन्नाचे स्त्रोत देखील वाढवण्याचा प्रयत्न सुरू आहे. राजकोषीय तूट तीन टक्याच्या आत ठेवण्याचा आमचा प्रयत्न असून कर्जाचे प्रमाण देखील 20 टक्क्यांच्या आत ठेवण्यात आलं आहे . देशात महाराष्ट्रासह केवळ तीन राज्य असं करू शकले आहेत.

बळीराजा योजनेवर नऊ हजार कोटी, कुंभमेळ्या साठी 3000 कोटी, महात्मा फुले आरोग्य योजनेची व्याप्ती वाढवून त्याला 900 कोटी रुपये अधिकचे तर संजय गांधी निराधार योजनेत निधीसाठी देखील रक्कम वाढवण्यात आली आहे . याखेरीज केंद्राकडून बिनव्याजी कर्ज मिळणार आहे त्याची मॅचिंग गग्रँट म्हणून 5600 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यामुळेच यावेळच्या पुरवणी मागण्यांची रक्कम वाढली असे देखील अजित पवार यांनी यावेळी स्पष्ट केलं.

राज्यातील अवकाळी पाऊस आणि पूरग्रस्त पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी केंद्र सरकारकडे 29 हजार 781 कोटी रुपयांची मागणी करण्यात आली आहे. तसा प्रस्ताव केंद्राकडे पाठवण्यात आला आहे. केंद्र सरकारचं एक पथक येऊन गेलं आहे. त्यांनी चार जिल्ह्यांची स्थिती पाहिली, आणखी एक पथक याच महिन्यात पुढील आठवड्यामध्ये येणे अपेक्षित आहे अशी माहिती देखील पवार यांनी यावेळी दिली.ML/ML/MS

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *