अजिंक्य रहाणे मुंबईत सुरू करणार अकॅडमी, राज्य सरकारकडून भूखंड

भारताचा क्रिकेटपटू अजिंक्य रहाणेला महाराष्ट्र सरकारकडून मोठी मदत जाहीर झाली आहे. सोमवारी (दि. 23 सप्टेंबर) राज्य मंत्रिमंडळाची बैठक मुंबईत पार पाडली. त्यावेळी महाराष्ट्र सरकारने सोमवारी (२३ सप्टेंबर) वांद्रे पूर्व भागातील २ हजार चौरस मीटरचा भूखंड हा रहाणे याला तीस वर्षांकरिता भाडेपट्ट्याने दिला आहे. येथे उच्चस्तरीय क्रीडा अकादमी सुरू करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. रहाणेला दिलेला भुखंड हा लिलावती रुग्णालयत आणि पश्चिम द्रुतगती मार्गाजवळ आहे. अजिंक्य रहाणेने X वर पोस्ट करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि बीसीसीआयचे कोषाध्यक्ष आशिष शेलार यांचे आभार मानले आहेत.