AI चा पराक्रम – ४ तासांच्या उपचाराचे १.७३ कोटी बिल आणले उघडकीस
मुंबई, दि. ५ : एका अमेरिकन व्यक्तीने, ज्याचे सोशल मीडिया नाव “nthmonkey” आहे, आपल्या मेहुण्याच्या मृत्यूनंतर हॉस्पिटलने पाठवलेले $195,000 (सुमारे ₹1.6 कोटी) चे बिल पाहून धक्का बसला. हे बिल केवळ चार तासांच्या ICU उपचारांसाठी होते. दुर्दैवाने, रुग्णाचे वैद्यकीय विमा दोन महिन्यांपूर्वीच संपले होते, त्यामुळे संपूर्ण खर्च कुटुंबावर पडला.
या व्यक्तीने Claude नावाच्या AI चॅटबॉटचा वापर करून बिलाचे बारकाईने विश्लेषण केले. Claude हा Anthropic कंपनीने विकसित केलेला AI आहे. चॅटबॉटने डुप्लिकेट चार्जेस, कोडिंग एरर्स आणि अस्पष्ट शुल्क शोधून काढले. त्यानंतर AI च्या मदतीने हॉस्पिटल प्रशासनाशी संवाद साधून बिलावर पुन्हा चर्चा केली गेली.
या प्रयत्नांमुळे बिल $33,000 (सुमारे ₹27 लाख) पर्यंत खाली आणण्यात यश मिळाले. AI च्या मदतीने केवळ आर्थिक बचतच झाली नाही, तर हॉस्पिटलच्या बिलिंग प्रक्रियेतील त्रुटीही उघड झाल्या. ही घटना सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली असून, अनेकांनी AI च्या वापराचे कौतुक केले आहे.
SL/ML/SL