Airtel चा सर्वात स्वस्त प्लॅन लाँच

रिलायन्स जिओ आणि व्होडाफोन आयडियाला टक्कर देण्यासाठी एअरटेलने एक नवीन स्वस्त प्रीपेड प्लॅन लाँच केला आहे. एअरटेलच्या नवीन रिचार्ज प्लॅनची किंमत 189 रुपये आहे, हा प्लॅन कंपनीच्या अधिकृत साइट आणि अॅपवर सूचीबद्ध करण्यात आला आहे. 200 रुपयांपेक्षा कमी किमतीचा परवडणारा प्लॅन शोधणाऱ्या वापरकर्त्यांना नक्की आवडेल.
एअरटेलच्या 189 रुपयांच्या प्लॅनमध्ये तुम्हाला 21 दिवसांची वैधता दिली जाणार आहे. तर या प्लॅनच्या फायद्यांबद्दल बोलायचे झाले तर, या प्लॅनमध्ये प्रीपेड वापरकर्त्यांना 1 जीबी हाय स्पीड डेटा, अमर्यादित कॉलिंग आणि 300 एसएमएस मिळतील. हा प्लॅन अशा लोकांसाठी लाँच करण्यात आलेला आहे ज्यांना अधिक डेटाऐवजी कमी किमतीत अमर्यादित कॉलिंगचा फायदा हवा आहे.
रिलायन्स जिओचा 189 रुपयांचा प्लॅन तुम्हाला एअरटेलपेक्षा दुप्पट डेटा देईल. हो, हा प्लॅन 1 नाही तर 2 जीबी हाय स्पीड डेटा देतो. याशिवाय, एअरटेलच्या तुलनेत, जिओचा हा प्लॅन तुम्हाला 1 आठवडा जास्त वैधता देईल, म्हणजेच जिओ प्लॅनसह तुम्हाला 28 दिवसांची वैधता मिळेल.
SL/ML/SL