या विमानतळांवरील प्रवास शुल्क तब्बल 22 पट वाढण्याची शक्यता

 या विमानतळांवरील प्रवास शुल्क तब्बल 22 पट वाढण्याची शक्यता

दिल्ली आणि मुंबई या देशातील दोन प्रमुख विमानतळांरून विमान प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांना लवकरच एक मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे. दूरसंचार वाद निवारण आणि अपीलीय न्यायाधिकरणने (TDSAT) दिलेल्या एका महत्त्वपूर्ण आदेशामुळे या दोन प्रमुख विमानतळांवरील प्रवासाचे शुल्क तब्बल 22 पटीने वाढू शकते. 2008-09 ते 2013-14 या आर्थिक वर्षांदरम्यान वापरकर्ता शुल्काच्या गणनेची पद्धत बदलल्यामुळे ही स्थिती उद्भवली आहे.

विमानतळ ऑपरेटर्स म्हणजेच दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळ (DIAL) आणि मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ ( MIAL) चा दावा आहे की या बदलांमुळे त्यांचे 50,000 कोटी रुपये पेक्षा जास्त नुकसान झाले आहे आणि आता हे नुकसान त्यांना वाढीव शुल्काच्या रूपात प्रवाशांकडून वसूल करण्याची परवानगी मिळाली आहे.

TDSAT चा हा आदेश लागू झाल्यास, तर प्रवासी शुल्कात (UDF) पुढील प्रमाणे मोठी वाढ होईल:

TDSAT च्या या आदेशाला विमान आर्थिक नियामक प्राधिकरण (AERA), भारतातील देशांतर्गत विमान कंपन्या तसेच लुफ्थांसा, एअर फ्रान्स आणि गल्फ एअर यांसारख्या आंतरराष्ट्रीय विमान कंपन्यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अरविंद कुमार आणि न्यायमूर्ती नीलाय विपिनचंद्र अंजारिया यांच्या खंडपीठासमोर या अत्यंत महत्त्वाच्या प्रकरणाची सुनावणी बुधवारी होणार आहे.

मुंबई, दि. १ :

SL/ML/SL

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *