कोल्हापुरात उतरले एअरबस समकक्ष १४६ आसनी विमान

 कोल्हापुरात उतरले एअरबस समकक्ष १४६ आसनी विमान

कोल्हापूर, दि. 22 (एमएमसी न्यूज नेटवर्क): नाइट लँडिंग सुविधेनंतर आता आसन क्षमता मोठी असणारे पहिलेच विमान कोल्हापूर विमानतळावर आज उतरले.कोल्हापूर विमानतळाच्या इतिहासात पहिल्यांदाच आज दुपारी ३ वाजून २० मिनिटांनी १४६ आसनांचे मोठे विमान उतरले.

मुंबईहून आलेल्या या विमानाचे कोल्हापूर विमानतळावरील नव्या अप्रॅनवर पार्किंग करण्यात आले.एमब्ररर ई १९५-ई २ प्रॉफिट हंटर या प्रकारातील हे विमान १४६ आसनी आहे. दुपारी साडेचारच्या सुमारास या विमानाने मुंबईच्या दिशेने पुन्हा उड्डाण केले.

त्यामुळे एअरबस सारखी विमानं कोल्हापुरात उतरण्यास आणि इथून उड्डाण करण्यास इथली धावपट्टी योग्य असल्याचे सिद्ध झाले आहे. यापूर्वी केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात कोल्हापूर दौऱ्यावर आले होते. त्यावेळी ते एम्ब्रेर लेगसी ६५० या जेट इंजिन असलेल्या विमानाने आले होते.

कोल्हापूर विमानतळाच्या इतिहासात पहिल्यांदाच इतक्या मोठ्या क्षमतेचं विमान उतरले होते. कोल्हापूर विमानतळावरून
१३ नोव्हेंबर रोजी यशस्वीपणे तिरूपतीला जाणाऱ्या विमानाचे रात्रीच्यावेळी उड्डाण झाले होते.

त्यानंतर आज १४६ आसनांचे एअरबसला समकक्ष असणारे विमान उतरले. त्यावर आता विमानतळाची धावपट्टी अशी मोठी विमानं उतरण्यास योग्य,पूरक आणि विमानतळावरील सुविधा सक्षम असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झाले. असल्याचे कोल्हापूर विमानतळ संचालक अनिल शिंदे यांनी सांगितले.

ML/KA/PGB
22 Nov .2022

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *