या राज्यात ज्येष्ठ नागरिकांना तीर्थयात्रेसाठी विमान प्रवास मोफत
भोपाळ,दि. ७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : केंद्र आणि राज्य सरकार ज्येष्ठ नागरिकांसाठी विविध योजना जाहिर करत असतात. रेल्वे आणि बसच्या भाड्यातही ज्येष्ठांना विशेष सवलत दिली जाते. यापुढे जाऊन आता मध्यप्रदेश सरकार ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत विमान सुविधा देऊ करणार आहे.
मुख्यमंत्र्यांची घोषणा
याबाबतची घोषणा स्वतः मुख्यमंत्र्यांनी केली आहे. भिंड येथील संत रविदास यांच्या जयंती आणि चंबळ विभागाच्या विकास यात्रेच्या शुभारंभप्रसंगी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी ही घोषणा केली आहे.
चौहान म्हणाले की, राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना पुढील महिन्यापासून विमानाने तीर्थयात्रेला जाण्याचा पर्याय उपलब्ध असेल. या तीर्थक्षेत्र योजनेत संत रविदासांच्या जन्मस्थानासह अनेक ठिकाणांचा समावेश करण्यात आला आहे. या तीर्थ दर्शन योजनेअंतर्गत 60 वर्षांपेक्षा जास्त वयाचे ज्येष्ठ नागरिक सरकारी खर्चाने तीर्थक्षेत्री जाऊ शकणार
SL/KA/SL
7 Feb. 2023