मुंबईतील हवेची गुणवत्ता धोक्याच्या पातळीपेक्षा अडीच पट जास्त

मुंबई, दि. १४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ऐन दिवाळीत आर्थिक राजधानी महानगरी मुंबईचा श्वास प्रचंड वायू प्रदुषणामुळे घुसमटला आहे. मुंबई महानगर पालिकेने प्रदुषण कमी करण्यासाठी फटाके वाजवण्यावर निर्बंध घातले असूनही नागरिकांकडून नियम धुडकावले जात असल्याने शहरातील हवेने धोक्याची पातळी ओलांडली आहे. मुंबई हायकोर्टाने यापूर्वी महाराष्ट्र सरकार आणि मुंबई आणि परिसरातील महापालिका अधिकाऱ्यांना वायू प्रदूषण कमी करण्यासाठी तातडीने पावले उचलण्याचे निर्देश दिले होते.
मुंबईतील एअर क्वालिटी इंडेक्स (AQI) खराब श्रेणीत आला असून प्रदुषणाचा स्तर 300 पार गेला आहे. जो धोक्याच्या पातळी पेक्षा अडीच पट जास्त आहे. यामुळे प्रदुषणयुक्त धुक्याची चादर मुंबईवर निर्माण झाली आहे.
सिस्टीम ऑफ एअर क्वालिटी ऑण्ड वेदर फोरकास्टिंग ऑण्ड रिसर्चनुसार (SAFAR) शहराचा एकूण AQI 300 च्यावर गेला जो खराब श्रेणीत येतो. दिवाळीच्या रात्री लोकांनी मोठ्या प्रमाणात फटाके फोडल्याने ही समस्या निर्माण झाली. यासह इतर कारणांमुळे देखील प्रदुषणात वाढ होत आहे. प्रदुषणाचे गांभीर्य लक्षात घेता BMC अॅक्शन मोडमध्ये आली आहे.
प्रदुषणाचे गांभीर्य लक्षात घेता बीएमसीकडून काल 6690 इंटीमेशन नोटीस बजावण्यात आल्या आहे. यासह दीड हजार किलोमीटरहून अधिक रस्ते स्वच्छ करण्यात आले आहेत. तर 200 हून अधिक इमारतींना स्टॉप वर्क नोटीस बजावण्यात आल्या आहेत. तर बाहेरून येणाऱ्या मोठ्या वाहनांचीही पीयुसी तपासली जात आहे.
बीएमसीने जारी बीएमसीने एक हेल्पलाइन क्रमांक जारी केला आहे. ज्यामध्ये वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमिवर कचरा जाळणाऱ्यांविरोधात तक्रार केली जाऊ शकते, तक्रारीनंतर कचरा जाळणाऱ्याला दंड भरावा लागेल. कारण कचरा जाळण्याच्या प्रकारामुळे देखील वायू प्रदुषण वाढत आहे. आतापर्यंत या हेल्पलाइनवर आठ हजाराहून अधिक तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यावर बीएमसीने कठोर कारवाई केली आहे, असे प्रशासनाने सांगितले.
SL/KA/SL
14 Nov. 2023