श्रीनगरमध्ये हवा प्रदुषणात मोठी वाढ
श्रीनगर, दि. २१ : भारताचे नंदनवन असलेल्या जम्मू काश्मीरलाही आता वायू प्रदूषणाचा विळखा बसला आहे. AQI डेटानुसार श्रीनगरमध्ये दररोज संध्याकाळी प्रदूषणाची पातळी वेगाने वाढते. सकाळी हवा स्वच्छ असते. संध्याकाळी सरासरी AQI-228 पर्यंत पोहोचतो. गेल्या 7 दिवसांचा AQI पाहिल्यास तो 100 च्या वरच राहिला आहे. तर 16 जानेवारी रोजी श्रीनगरचा AQI सर्वात खराब 415 नोंदवला गेला. श्रीनगरचे वायू प्रदूषण ७ वर्षांतील सर्वात वाईट पातळीवर पोहोचले आहे. बुधवारी शहराचा वायू गुणवत्ता निर्देशांक (AQI) ३०८ नोंदवला गेला. वायू निरीक्षण डेटानुसार, जानेवारीमध्ये शहराची वायू गुणवत्ता खूपच खराब राहिली आहे.
श्रीनगर शहरात वाहनांची संख्या झपाट्याने वाढली आहे. डिझेल व पेट्रोलवर चालणाऱ्या वाहनांमधून PM2.5 व PM10 कण मोठ्या प्रमाणात उत्सर्जित होतात. पावसाचे प्रमाण कमी असल्याने हवेतील प्रदूषक सहजपणे खाली बसत नाहीत. हिवाळ्यातील थंड हवामानामुळे धूर व धुक्याचे मिश्रण (smog) तयार होते. हिवाळ्यात लाकूड, कोळसा किंवा इतर इंधन जाळून उष्णता निर्माण केली जाते. यामुळे कार्बन मोनोऑक्साइड व सूक्ष्मकणांचे प्रमाण वाढते.
SL/ML/SL