वायू प्रदूषण कमी करण्यासाठी महापालिकेचे मोठे पाऊल
मुंबई, दि. 18 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : वायू प्रदूषण कमी करण्यासाठी शहरातील हॉटेल, ढाबा आणि बेकरी या ठिकाणी लाकूड व कोळसा जाळण्यास महापालिकेने बंदी घातली आहे. त्याऐवजी एलपीजी गॅस, इलेक्ट्रिक ओव्हन, बायोगॅस, किंवा हरित (ग्रीन) गॅस वापरण्याची सक्ती करण्यात आली आहे. त्याचा वापर न केल्यास पहिल्यांदा पाच हजार, दुसऱ्यांदा दहा हजार रुपये दंड केला जाणार आहे. त्यानंतर हॉटेल, ढाबा व बेकरी लाखबंद (सील) केली जाणार आहे.
पिंपरी-चिंचवड शहरातील हॉटेल, ढाबा व बेकरी या ठिकाणी स्वयंपाक करण्यासाठी सर्रासपणे लाकूड व कोळसा वापरला जातो. कोळसा व लाकूड जाळल्याने वायूप्रदूषण होऊन पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. हानिकारण कण, कार्बन मोनोऑक्साईड तयार होऊन प्रदूषणात भर पडते. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर विपरित परिणाम हाेत आहे. पर्यावरणाचाही ऱ्हास होतो. हे रोखण्यासाठी हॉटेल, ढाबा आणि बेकरी येथे लाकूड आणि कोळसा वापरण्यास बंदी घातली आहे. त्याऐवजी केवळ एलपीजी गॅस किंवा नैसर्गिक वायू वापरण्याची सक्ती करण्यात आली आहे.
PGB/ML/PGB
18 Oct 2024