एअर इंडियाचा Freedom Sale, परदेश प्रवास फक्त ४२०० मध्ये

मुंबई, दि. १० : 79व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त एअर इंडिया एक्सप्रेसने प्रवाशांसाठी खास ‘फ्रीडम सेल’ जाहीर केली आहे. या अंतर्गत तब्बल 50 लाख तिकिटांवर मोठी सवलत दिली जाणार आहे. यामध्ये, देशांतर्गत उड्डाणांची किंमत 1,279 रुपयांपासून सुरू होणार आहे. तर आंतरराष्ट्रीय उड्डाणांची संधी फक्त 4,279 रुपयांपासून उपलब्ध केली जाणार आहे.
ही ऑफर 10 ऑगस्ट 2025 पासून एअरलाइनच्या अधिकृत वेबसाइट (www.airindiaexpress.com) आणि मोबाइल अॅपवर उपलब्ध होणार आहे. 11 ते 15 ऑगस्ट या दरम्यान ही सुविधा सर्व प्रमुख ट्रॅव्हल बुकिंग प्लॅटफॉर्मवरही उपलब्ध असेल.
बुकिंगची शेवटची तारीख : 15 ऑगस्ट 2025
प्रवास कालावधी : 19 ऑगस्ट 2025 ते 31 मार्च 2026
तसेच एअर इंडियाने आपल्या मेंबर्ससाठीही खास सवलत जाहीर केली आहे. गॉरमैयर हॉट मील, केबिन व अतिरिक्त चेक-इन बॅगेज आणि ‘एक्सप्रेस अहेड’ सेवांवर 20 टक्क्यांपर्यंत सवलत देण्यात येणार आहे.
मुंबई, दि. १० :
SL/ML/SL