एअर इंडीयाच्या ताफ्यात ५०० विमानांची भर, नोकरीच्या हजारो संधी

 एअर इंडीयाच्या ताफ्यात ५०० विमानांची भर, नोकरीच्या हजारो संधी

मुंबई, दि. २७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सरकारी मालकी जाऊन टाटा कंपनीच्या मालकीच्या झालेली एकर इंडिया कंपनी आता अधिकाधिक प्रगती करताना दिसत आहे. एअरलाइन्सने बोईंग आणि एअरबससह ४७० विमानांची ऑर्डर दिली आहे. यामध्ये वाइड बॉडी विमानांचा समावेश आहे. यामुळे एअर इंडिया येत्या काळात एक हजारहून अधिक पदांसाठी नवीन भरती करणार आहे. आपले बाजारमूल्य वाढवण्यासाठी कंपनी पायलट आणि प्रशिक्षक यांसारख्या पदांवर ही नोकरीची संधी देणार आहे.

कंपनीने आज नवीन भरतीबाबत माहिती दिली. कंपनीने म्हटले आहे की, “आम्ही पायलट, फर्स्ट ऑफिसर्स तसेच ट्रेनर्सच्या भरतीची ऑफर देत आहोत. नवीन विमानं A320, B777, B787 आणि B737 या प्रकारात घेतली जात आहेत. यामध्ये १०० हून अधिक विमानांचा समावेश होणार आहे. अलीकडेच एअर इंडियाच्या वैमानिकांनी त्यांच्या पगाराच्या संरचनेत आणि सेवेच्या परिस्थितीत बदल करण्याबाबत एअरलाइनच्या ताज्या निर्णयावर चिंता व्यक्त केली. खरे तर १७ एप्रिल रोजी एअर इंडियाने केबिन क्रूसाठी सुधारित नुकसानभरपाई संरचना सादर केली होती, जी दोन वैमानिक संघटना युनियन्स – इंडियन कमर्शियल पायलट असोसिएशन (ICPA) आणि इंडियन पायलट्स गिल्ड (IPG) ने नाकारली होती.

एअर इंडिया, एअर इंडिया एक्सप्रेस, एआयएक्स कनेक्ट आणि विस्तारा या चार एअरलाइन्स टाटा समूहाच्या अंतर्गत काम करतात. टाटा समूह एअर इंडिया एक्सप्रेस, एआयएक्स कनेक्ट विलीन करण्याच्या प्रक्रियेत आहे. याशिवाय विस्तारा आणि एअर इंडियाचेही विलीनीकरण केले जात आहे.

SL/KA/SL

27 April 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *