देशभरात ट्रकमध्ये वातानुकूलित केबिन होणार अनिवार्य

 देशभरात ट्रकमध्ये वातानुकूलित केबिन होणार अनिवार्य

नवी दिल्ली, दि. १२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशभरात मालवाहतूकीमध्ये ट्रकद्वारे होण्याला वाहतूकीचे मोठे योगदान आहे. मात्र त्या बरोबरच दिवसरात्र ट्रक सारखे अवजड वाहन चालवत असताना ट्रक चालकांची खूपच दमणूक होते. भारतील हवामान उष्ण असल्याने रणरणत्या उन्हातून लांब पल्ल्याच्या अंतरावर एसी शिवाय ट्रक चालवणे फारच त्रासाचे आहे. अशा या त्रासाच्या कामामुळे रस्ते अपघातात ट्रक अपघातांचे प्रमाण खूप अधिक आहे. वातानुकूतित केबिन नसल्याने अनेकदा ट्रक चालक अस्वस्थ होतात. त्यामुळे अनेकदा अपघातही होतात. आता ट्रकच्या कामकाजाची परिस्थिती सुधारण्यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने पाऊल उचललं आहे.

केंद्रीय वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने एक अधिसूचना जारी करत सांगितलं आहे की, “1 ऑक्टोबर 2025 रोजी किंवा त्यानंतर उत्पादित केलेल्या एन२ आणि एन३ श्रेणीतील वाहनांच्या केबिनमध्ये वातानुकूलित यंत्रणा बसवली आहे. तसेच एअर कंडिशनिंग सिस्टम असलेल्या केबिनची चाचणी भारतीय मानक संस्थेच्या नियमानुसार असावी.”

याबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितलं होतं की, ‘भारतातील ट्रक ड्रायव्हर्स हा सार्वजनिक वाहतुकीतील सर्वाधिक दुर्लक्षित विभाग आहे. अत्यंत हालाखीच्या परिस्थितीत ट्रक चालक काम करत असतात. त्यांच्यावर देशातील जीवनावश्यक आणि इतर वस्तूंच्या पुरवठ्याची जबाबदारी असते. अनेकदा ठरलेल्या तासांपेक्षा जास्त काळ काम करतात. यामुळे त्यांची चांगलीच दमछाक होते. यामुळे अनेकदा महामार्गावर रस्ते अपघात होऊ शकतात.’ एन2 कॅटेगरी म्हणजे ज्या ट्रकचं वजन 3.5 टनाहून जास्त आणि 12 टनापेक्षा कमी असतं. तर एन3 कॅटगरी म्हणजे ज्या ट्रकचं वजन 12 टनापेक्षा अधिक असते.

केंद्रीय वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने अधिसूचना जारी केल्यानंतर मंत्री नितीन गडकरी यांनी समाधान व्यक्त केलं आहे. “ट्रक चालकांचं काम आणि प्रवास सुखकर करण्यासाठी हे पाऊल महत्त्वाचं ठरेलं. त्यामुळे त्यांच्या कार्यक्षमतेत वाढ होईल. तसेच त्यांना लांबच्या पल्ल्यात थकवा जाणवणार नाही.” एसी केबिनमुळे व्यवसायिक वाहनांच्या किंमतीत वाढ होईल असं सांगण्यात आहे. या निर्णयावर काही जणांनी नकारात्मक प्रतिक्रियाही दिल्या होत्या. पण याकडे आता सकारात्मक बदल म्हणून पाहणंही तितकंच गरजेचं आहे.

SL/KA/SL

12 Dec. 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *