खास शिक्षकांसाठी AICTE फेलोशिप

 खास शिक्षकांसाठी AICTE फेलोशिप

मुंबई, दि. २५ : शिक्षण क्षेत्र आणि उद्योग जगतातील दरी भरून काढण्याच्या उद्देशाने ‘ ऑल इंडिया कौन्सिल ऑफ टेक्निकल एज्युकेशन ‘ने (एआयसीटीई) ‘एआयसीटीई इंडस्ट्री फेलोशिप योजने’ची घोषणा केली आहे. ही योजना उच्च शिक्षण क्षेत्रातील अध्यापकांसाठी आहे. यासाठी पहिल्या टप्प्यात तीनशे शिक्षकांची निवड केली जाणार आहे.

‘एआयसीटीई’ मार्फत यासाठीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, १५ जुलैपर्यंत ही अर्ज प्रक्रिया सुरू राहणार आहे. देशातील तरुणांकडे उच्च शिक्षित पदवी असली तरी उद्योग क्षेत्राला आवश्यक ती कौशल्ये नसतात. ‘एनईपी-२०२०’च्या अंमलबजावणीदरम्यान शिक्षण व उद्योग क्षेत्र यातील दरी भरून काढण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत.

ऑन जॉब ट्रेनिंग, इंटर्नशिप यांचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे. तसेच ‘एआयसीटीई’ ने नुकतीच ‘इंडस्ट्री फेलोशिप योजने’ची घोषणा केली. यात निवड होणाऱ्या शिक्षकांना ‘एआयसीटीई’ कडून ७५ हजार रुपये व ज्या उद्योग समूहात निवड झाली आहे, त्या उद्योग समूहाकडून किमान २५ हजार रुपये मिळणार आहेत. तसेच महाविद्यालयाकडून मिळणारे वेतनही या काळात मिळणार आहे.

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *