विम्बल्डन टेनिस कोर्टवर AI बजावणार पंचाची भूमिका

 विम्बल्डन टेनिस कोर्टवर AI बजावणार पंचाची भूमिका

जगातील सर्वात प्रतिष्ठित आणि परंपरा जपणाऱ्या विम्बल्डन स्पर्धेत (Wimbledon 2025) यंदापासून एक मोठा बदल पाहायला मिळत आहे. 148 वर्षांच्या इतिहासात प्रथमच, मानवी लाइन जजेसना ‘एआय’ आधारित बॉल ट्रॅकिंग तंत्रज्ञानाने बदलण्यात आले आहे. म्हणजेच आता टेनिस कोर्टवर मानवी पंचांऐवजी एआय पंचांची (AI) भूमिका बजवणार आहे.

विम्बल्डन ही सर्वात प्रतिष्ठित टेनिस स्पर्धा समजली जाते. खेळाडूंचे पांढरे किट, विशिष्ट कपडे परिधान करून उभे असणारे लाइन जजेस हे या स्पर्धेचे एक वैशिष्ट्य आहे. अनेक दशकांपासून हे पंच टेनिस कोर्टवर निर्णय घेण्यात महत्त्वाची भूमिका बजावत आले आहेत.परंतु, आता त्यांची जागा एआय बॉल ट्रॅकिंग तंत्रज्ञानाने घेतली आहे.

ऑल इंग्लंड क्लबने आपल्या लाइन जजेसना एआय कॉलने (Wimbledon line judges) बदलण्याचा निर्णय घेतला आहे. डब्ल्यूटीएनेही या हंगामात आपल्या अम्पायरिंगमध्ये एआय समाविष्ट केले आहे.

ही प्रणाली कॅमेरे, कॉम्प्युटर आणि सेन्सर्सचा वापर करून बॉलचे मार्ग नियंत्रित करते, ज्यामुळे चेंडू लाइन्सच्या आत आहे की बाहेर हे मानवी हस्तक्षेपाशिवाय शोधले जाते. थोडक्यात, आता खेळाडूने सर्व्हिस केल्यावर चेंडू कोर्टच्या आत आहे की बाहेर हे आता थेट एआय पंच ठरवणार आहे.

इतर क्षेत्रासह आता टेनिसमध्ये देखील एआय महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र, विम्बल्डन स्पर्धेतील या तंत्रज्ञानाच्या वापराबाबत खेळाडूंकडून समिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळत आहे. अनेक खेळाडूंना या तंत्रज्ञानामुळे समस्या जाणवत आहे.

SL/ML

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *